पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध, पत्नीने घटस्फोट मागितला म्हणून अ‍ॅसिड फेकले

पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध, पत्नीने घटस्फोट मागितला म्हणून अ‍ॅसिड फेकले

पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे कळताच पत्नीने घटस्फोटाची मागणी केली. यामुळे पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकल्याची घटना मुंबईतील मालाड परिसरात घडली. महिलेच्या फिर्यादीवरून मालाड पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे पती बेरोजगार असून त्याला अंमली पदार्थांचे व्यसन आहे. 2019 मध्ये महिलेचा प्रेमविवाह झाला होता. पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळताच पीडिता गेल्या तीन महिन्यांपासून आईच्या घरी राहत होती.

आरोपी बुधवारी सकाळी मालाड येथे पीडितेच्या आईच्या घरी गेला. त्याने बळजबरी घरात प्रवेश करत महिलेच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

महिलेने तात्काळ मालाड पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 124(2) (नुकसान करण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीवर ॲसिड फेकणे), 311 (दुर्घटना किंवा मृत्यूचा प्रयत्न करून दरोडा किंवा डकैती), 333 (हल्ल्याच्या तयारीनंतर अतिक्रमण), आणि 352 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;