तामिळनाडूत मिनीबस पलटली, अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू

तामिळनाडूत मिनीबस पलटली, अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू

मिनीबस पलटल्याने झालेल्या अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडूत घडली. अपघातात बसमधील अन्य 10 प्रवाशी जखमी झाले आहेत. मम्सपुरम गांधी नगर परिसरात शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. तीन विद्यार्थ्यांपैकी दोन शाळकरी मुले आहेत.

श्रीविल्लीपुथूर नगरपालिकेजवळ ही घटना घडली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे, असे विरुधुनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विरुधुनगर जिल्ह्यातील बस अपघातात झालेल्या चौघांच्या मृत्यू प्रकरणी शोक व्यक्त केला आहे. तसेच आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;