Bhool Bhulaiyaa 3: मोंजोलिका परततेय..; घाबरगुंडी उडवणारा ‘भुलभुलैय्या 3’चा टीझर पाहिलात का?

Bhool Bhulaiyaa 3: मोंजोलिका परततेय..; घाबरगुंडी उडवणारा ‘भुलभुलैय्या 3’चा टीझर पाहिलात का?

‘आमी जे तोमार..’, ‘मोंजोलिका’ म्हटलं की ‘भुलभुलैय्या’ या चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 2007 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यात अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर 2022 मध्ये ‘भुलभुलैय्या 2’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये अक्षय कुमारची जागा अभिनेता कार्तिक आर्यनने घेतली होती. कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू या तिघांच्या यात मुख्य भूमिका होत्या. आता ‘भुलभुलैय्या 3’ या चित्रपटाची घोषणा झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका पहायला मिळत आहेत. अनीस बाझमीने या तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन केलं आहे. 2007 नंतर विद्या पुन्हा एकदा या चित्रपटात मोंजोलिकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची घाबरगुंडी उडवणार असल्याचं ‘भुलभुलैय्या 3’चा टीझर पाहून दिसतंय.

‘आमी जे तोमार’ या ऑडिओने ‘भुलभुलैय्या 3’च्या टीझरची सुरुवात होते. पुन्हा एकदा यात विद्या बालनचा भयभीत करणारा लूक पहायला मिळतो. पहिल्या भागात ज्याप्रकारे ती तिच्या एका हाताने बेड उचलल्याचं दाखवलं गेलं, तसाच सीन पुन्हा या टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. यावेळी ती जोरात ओरडत मोठी खुर्ची एका हाताने उचलते. तिसऱ्या भागात कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रुह बाबाच्या भूमिकेत दिसणार आहे. मोंजोलिकाला पकडण्याचं काम त्याच्या हाती सोपवलं जातं. ‘ॲनिमल’ फेम तृप्ती डिमरी यामध्ये रुह बाबाच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितसुद्धा या चित्रपटात झळकणार असल्याची जोरदार चर्चा होती, मात्र टीझरमध्ये तिची कोणतीही झलक पहायला मिळत नाही.

पहा टीझर

‘भुलभुलैय्या 3’ची कथा, पटकथा आणि संवाद आकाश कौशिकने लिहिले आहेत. हा तिसरा भाग कॉमेडीपेक्षा जास्त हॉरर असल्याचं टीझरवरून समजतंय. 2022 मध्ये ‘भुलभुलैय्या 2’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यावेळी हिंदी सिनेसृष्टीला कोरोना महामारीचा फटका बसला होता. अशा कठीण काळात कार्तिकच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणत 185 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;