बायकोला बिकिनीमध्ये पाहण्यासाठी केला 418 कोटींचा खर्च

बायकोला बिकिनीमध्ये पाहण्यासाठी केला 418 कोटींचा खर्च

दुबईतील एका अब्जाधीशाने आपल्या पत्नीला बिकिनीमध्ये पाहण्यासाठी चक्क संपूर्ण एक बेट खरेदी केले. पत्नीला बिकिनीमध्ये अन्य दुसऱया कोणी व्यक्तीने पाहू नये, यासाठी ही शक्कल लढवली, असा दावा खुद्द त्याच्या पत्नीने केला आहे. यासंबंधीचा एका खासगी बेटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 26 वर्षीय सौदी अल नदाक ही दुबईतील व्यावसायिक जमला अल नदाक यांची पत्नी आहे. ती मूळची ब्रिटिश असून आपण पूर्णवेळ गृहिणी आहोत, असे सांगते.

– या उच्चभ्रू जोडप्याची दुबईत शिक्षण घेत असताना ओळख झाली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी हे दोघे विवाहबंधनात अडकले. कोटय़वधी रुपयांची मालकीन असलेली सौदी एक इन्फ्लुन्सरसुद्धा आहे.

– हे बेट नेमके कुठे आहे, यासंबंधी तिने माहिती दिली नाही. ते गुपित ठेवले आहे. परंतु नवऱ्याने हे बेट खरेदी करण्यासाठी 50 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 418 कोटी रुपये खर्च केले आहेत, असा दावा पत्नीने केला आहे. नवऱयाला गुंतवणुकीसाठी एक बेट खरेदी करायचे होते, असेही ती म्हणाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;