‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांकडून ‘सोनू’ला कायदेशीर नोटीस; अभिनेत्रीकडून शोषणाचा आरोप

‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांकडून ‘सोनू’ला कायदेशीर नोटीस; अभिनेत्रीकडून शोषणाचा आरोप

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता ही मालिका त्यातील सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानीमुळे चर्चेत आली आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी पलकला कायदेशीर नोटीस बजावली आहे. निर्मात्यांची लेखी परवानगी न घेतला पलकने इतर ब्रँडसोबत काम केल्याने कराराचं उल्लंघन झालंय, असं या नोटिशीत म्हटलंय. यामुळे मालिकेच्या निर्मात्यांना फटका सहन करावा लागला, म्हणूनच पलकला नोटीस बजावल्याचं म्हटलं जात आहे. पलकला अनेकदा लेखी आणि तोंडी इशारा देऊनही तिने सातत्याने कराराचं उल्लंघन केलं, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे पलकने ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडण्यास तयार असल्याचं म्हटलंय. किंबहुना मालिका सोडत असल्यामुळेच निर्माते अशा पद्धतीने कारवाई करत असल्याचा आरोप तिने केला आहे.

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पलक म्हणाली, “मी 8 ऑगस्ट रोजीच मालिका सोडण्याच्या माझ्या निर्णयाबाबत निर्मात्यांना कळवलं होतं. त्यांनी काही वेळ मागितला आणि त्यानंतर ते मला अधिकृतरित्या मेल पाठवणार होते. त्याच मेलवर मला राजीनाम्याचं पत्र लिहिण्यास त्यांनी सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी मला मेल पाठवलाच नाही. त्यांनी माझा राजीनामा स्वीकार केला नाही आणि त्याच्या काही दिवसांतच माध्यमांमध्ये माझ्याविरोधातील बातम्या दिसू लागल्या होत्या. मीच कराराचं उल्लंघन केलं, असा आरोप त्यांनी केला. मी पाच वर्षांपूर्वी या मालिकेसोबत करार केला होता आणि त्यांनी मला त्याची कॉपीसुद्धा दिली नाही. मला 19 सप्टेंबर 2024 रोजी कराराची कॉपी मिळाली. त्यांनी मला इतर जाहिराती करण्यास परवानगी दिली होती. आता मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते माझ्यावर असे आरोप करत आहेत. खरंतर हे एकप्रकारे शोषणच आहे. पाच वर्षे त्या टीमसोबत काम केल्यानंतर अशी वागणूक मिळेल याची मी अपेक्षासुद्धा केली नव्हती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. आजसुद्धा या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. यातील बरेच कलाकार बदलले, तरीसुद्धा टीआरपीच्या यादीत ही मालिका अव्वल ठरते. परंतु ही मालिका त्याच्याशी संबंधित विविध वादांमुळेही सतत चर्चेत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;