Maharashtra Assembly Election : विधानसभेची लगबग सुरू, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत

Maharashtra Assembly Election : विधानसभेची लगबग सुरू, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील केंद्रीय निवडणूक आयोगाचे 14 जणांचे पथक आज रात्री मुंबईत दाखल झाले आहे. हे पथक पुढील शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस केंद्रीय पथक राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे.

निवडणूक आयोगाचे पथक शुक्रवारी सकाळी 10 वाजता विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहे. त्यानंतर दुपारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व नोडल ऑफिसर यांची बैठक घेईल. तसेच गुप्तचर व विविध अंमलबजावणी संस्थांच्या अधिकाऱयांकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महानिरीक्षक, प्रशासकीय विभागाचे विविध सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतील. शनिवारी केंद्रीय निवडणूक पथकाची राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिह्यांतील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक होईल. प्रशासनाची प्रशासकीय तयारी, पोलीस अधिकाऱ्यांकडून कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती आणि निवडणूक अधिकाऱयांकडून माहिती, आढावा घेतल्यानंतर आयोगाचे पथकाची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता हे पथक दिल्लीकडे रवाना होईल.

निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल

महाराष्ट्रात 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान मतदान आणि 20 नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम असेल अशी शक्यता निवडणूक कार्यालयातील अधिकाऱयांकडून व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;