लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू

लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू

लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समित ज्ञानेश्वर गोंदके असे मृत पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी कुर्ला रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच लोकलमध्ये झालेल्या गर्दीमुळे त्यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचे बोलले जाते.

समित हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता ते ड्युटी संपवून त्याच्या डोंबिवली येथील घरी जाण्यासाठी निघाले होते. अंधेरी-घाटकोपर असा मेट्रोने प्रवास केल्यानंतर ते लोकलने प्रवास करत होते. यावेळी भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकादरम्यान त्यांचा तोल गेला आणि ते चालत्या लोकलमधून खाली पडले.

रेल्वेतून पडल्याने त्यांचा एक हात खांद्यापासून तुटून वेगळा झाला होता. तसेच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कवटी फुटून अंगावर अनेक खरचटल्याच्या जखमा झाल्या होत्या. रात्रभर ते तिथे जखमी अवस्थेत पडले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;