दप्तर आणले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करत वीजेचा शॉक दिला; शिक्षकाचे क्रूर कृत्य

दप्तर आणले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करत वीजेचा शॉक दिला; शिक्षकाचे क्रूर कृत्य

शाळेत दप्तर आणायला विसरला म्हणून माथेफिरू शिक्षकाने सात वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत क्रूर कृत्य केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली. शिक्षकाने आधी विद्यार्थ्याचे कपडे आणि शूज उतरवून त्याला मारहाण केली. मग वीजेचा शॉक दिला. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी लोढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अलीगडमधील लोढा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. मुलाने घरी जाऊन आईला घडला प्रकार सांगितल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यानंतर पालकांनी शाळेत धाव घेत घटनेबाबत विचारणा केली. त्यानंतर पोलीस ठाणे गाठत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.

घटनेदिवशी पीडित मुलाचे वडील कामानिमित्त शहराबाहेर गेले होते. तर आई आजारी होती. त्यामुळे आजोबांनी त्याला शाळेत सोडले. दरम्यान पालकांचा आरोप शाळेच्या मुख्याध्यापकांनी फेटाळून लावला आहे. विद्युत शॉक दिल्याची बाब खोटी असल्याचे मुख्याध्यापकांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;