Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारेखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज

Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारेखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज

अक्षय कुमारचा ‘भूल भुलैया’ सिनेमा आणि कार्तिक आर्यनचा भाग 2 बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. तेव्हापासून चाहत्यांना ‘भुलभुलैया 3’ सिनेमाची उत्सुकता लागली होती. मात्र त्यांची प्रतिक्षा संपली आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले असून या सिनेमाच्या टीझरची तारीखही समोर आली आहे.

विद्या बालन पुन्हा एकदा मंजुलिकेच्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे. निर्माते या सिनेमाचे एकापाठोपाठ एक पोस्टरही शेअर करत आहेत. पोस्टर शेअर केल्यानंतर आता ‘भुलभुलैया 3’ सिनेमाच्या टिझरची तारीखही जाहीर केली आहे.

‘भुलभुलैया 3’ सिनेमाने निर्माते अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भुलभुलैया 3’ सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमात विद्या बालनसह कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी दिसणार आहेत.

bhool bhulaiyaa 3 Teaser

पिंकविल्लाच्या वृत्तानुसार, निर्माते ‘भूल भुलैया-3’ चे टीझर या आठवड्यात म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी रिलीज करणार आहेत. टीझर रिलीजच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. हा 1 मिनिट 32 सेकंदाचा टीझर सेन्सॉर बोर्डाने U/A प्रमाणपत्रासह पास केला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;