शाहरुख खान याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याला बघताच चाहत्यांनी…
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. शाहरुख खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत लकी ठरले. यावर्षी त्याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसले. विशेष म्हणजे त्याच्या चित्रपटांनी धमाकाही केला. शाहरुख खान याचा 2018 मध्ये झिरो हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, त्याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि त्याचा हा चित्रपट फ्लॉप गेला. त्यानंतर काही वर्ष शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. मध्यंतरी चर्चा देखील होती की, शाहरुख खान हा मोठ्या पडद्यावर परत धमाल करणार नाहीये. मात्र, धमाकेदार पद्धतीने शाहरुख खानने पुनरागमन केले.
शाहरुख खान याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी कायमच करतात. आता नुकताच शाहरुख खान हा मुंबई विमानतळावर स्पॉट झालाय. शाहरुख खान याला पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचे बघायला मिळाले. फक्त हेच नाही तर आपल्या लाडक्या अभिनेत्याने आपल्याकडे पाहावे, यासाठी जोरात आवाज देतानाही लोक दिसत होते.
शाहरुख खान हा आयफा 2024 ला होस्ट करण्यासाठी अबूधाबीला निघाला. शाहरुख खान आणि करण जोहर हे दोघे मिळून आयफा 2024 ला होस्ट करताना दिसणार आहेत. शाहरुख खान याचा आता विमानतळावरील व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, लोकांनी शाहरुख खानला पाहून इतकी जास्त गर्दी केली की, त्या गर्दीमधून निघणे शाहरुखला शक्य होत नाही. पोलिस आणि सुरक्षारक्षकांच्या मदतीने शाहरुख खानला विमानतळामध्ये प्रवेश करता आला. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, अरे इतके जास्त काय झाले? तो देखील आपल्यासारखा सामान्य व्यक्तीच आहे.
शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. मात्र, तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप गेला. सध्या शाहरुख खानची लेक सुहाना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. ती कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अनंत अंबानीच्या लग्नात धमाल करताना सुहाना खान ही दिसली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List