बिहारमध्ये मृत्युचं तांडव; जितिया व्रतानिमित्त नदीत उतरलेले 49 जण बुडाले, 41 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये मृत्युचं तांडव; जितिया व्रतानिमित्त नदीत उतरलेले 49 जण बुडाले, 41 जणांचा मृत्यू

देशभरामध्ये बुधवारी जितिया व्रत पाळण्यात आले. याला बिहारमध्ये गालबोट लागले असून जितिया व्रतानिमित्त गंगा नदीमध्ये उतरलेले 49 भाविक बुडाले. यापैकी 41 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात महिलांसह मोठ्या प्रमाणात मुला-मुलींचा समावेश आहे.

औरंगबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अंघोळीसाठी तलावात उतरलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला. यात 2 महिलांचा आणि 6 मुलींचा समावेश आहे. यासह सारण जिल्ह्यातही आईसोबत अंघोळीला गेलेल्या पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. तर कैमूर जिल्ह्यात जितिया सणावेळी नदीत आणि तलावात उतरलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोहतास जिल्ह्यातील डिहरी पाली पुलाजवळही अशीच घटना घडली. सोन नदीमध्ये अंघोळीसाठी उतरलेल्या 13 वर्षाचा मुलगा बुडाला. तर मोतीहारी जिल्ह्यातील कल्याणपूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या वृंदावन परसौनी येथे आई आणि मुलीसह दोन अन्य मुलांचा बुडून मृत्यू झाला. तर कल्याणपूर येथे तीन मुली बुडाल्या.

राजधानी पाटणातील बिहटा पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या अमनाबाद हलकोरिया चक गावामध्ये सोन नदीमध्ये अंघोळीला उतरलेल्या आईसह 14 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी एका महिलेने आणि दोन तरुणींनी नदीत उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्या देखील बुडाल्या. यामुळे खळबळ उडाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;