‘धडकन’मधील देव-अंजली आले एकमेकांसमोर; चाहते म्हणाले सीक्वेल लवकरच

‘धडकन’मधील देव-अंजली आले एकमेकांसमोर; चाहते म्हणाले सीक्वेल लवकरच

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी हे मुंबईतल्या एका कार्यक्रमात एकमेकांसमोर आले. यावेळी पापाराझींनी या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. या कार्यक्रमात शिल्पा आणि सुनील शेट्टी यांनी एकत्र फोटोसाठी पोझसुद्धा दिले. ही लोकप्रिय जोडी 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धडकन’ या चित्रपटात एकत्र झळकली होती. या चित्रपटात शिल्पाने सुनील शेट्टीच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. त्यातील गाणी, डायलॉग आजही चाहत्यांच्या तोंडपाठ आहेत. आता बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा हे दोन कलाकार एकमेकांसमोर आले, तेव्हा नेटकऱ्यांना ‘धडकन’ची आवर्जून आठवण आली.

शिल्पा आणि सुनील शेट्टी एकमेकांसमोर आल्यावर पापाराझी ‘अंजली’ म्हणून तिला हाक मारू लागले. हे ऐकून शिल्पालाही हसू अनावर झालं होतं. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कमेंट्समध्ये अनेकांनी ‘धडकन 2’ हा चित्रपट लवकरच आणावा, अशी मागणी केली. ‘या दोघांना पुन्हा एखाद्या चित्रपटात एकत्र पाहायला खूप आवडेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘प्लीज धडकन 2 हा चित्रपट लवकरच आणा’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यावेळी शिल्पाने साडी नेसली होती, तर सुनील शेट्टीने पांढरा शर्ट आणि त्यावर ब्लेझर-पँट परिधान केला होता. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धडकन’ या चित्रपटात सुनील आणि शिल्पा शेट्टी यांच्यासोबत अक्षय कुमारनेही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील शिल्पा आणि सुनील शेट्टी यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.

शिल्पा लवकरच ‘केडी: द डेविल’ या कन्नड चित्रपटात झळकणार असून यामध्ये ध्रुवा सर्जा, व्ही. रविचंद्रन, रमेश अरविंद, संजय दत्त, जिशू सेनगुप्ता आणि नोरा फतेही यांच्याही भूमिका आहेत. प्रेम दिग्दर्शित हा चित्रपट तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. तर सुनील शेट्टी लवकरच ‘हंटर 2’ आणि ‘लेजंड ऑफ सोमनाथ’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;