‘तू मला राज ठाकरेंचं कौतुक नको सांगू..’; ‘येक नंबर’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

‘तू मला राज ठाकरेंचं कौतुक नको सांगू..’; ‘येक नंबर’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

गेल्या काही दिवसांपासून ज्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे, त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘येक नंबर’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता होती. आता अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘येक नंबर’ या चित्रपटाच्या पोस्टरपासूनच हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय. ट्रेलरमध्ये प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास दिसत आहे. प्रताप त्याचं ध्येय साध्य करू शकेल का? या प्रश्नाचं उत्तर येत्या 10 ऑक्टोबरला प्रेक्षकांना मिळेल. ट्रेलरमध्ये राज ठाकरेंचा उल्लेख, त्यांचा फोटो, ‘शिवतीर्थ’ या सगळ्यांची झलक पाहिल्यानंतर आता चित्रपटात राज ठाकरे स्वतः अभिनय करणार आहेत का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

‘येक नंबर’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची झलकही दिसत आहे. या चित्रपटातून मलायकाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. चित्रपटात मलायकाची भूमिका आहे की ती फक्त एका गाण्यापुरतीच दिसणार, हे आगामी काळात प्रेक्षकांना समजेल. याआधी चित्रपटातील ‘जाहीर झालं जगाला’ या प्रेमगीताने प्रेक्षकांना भुरळ घातली असून सध्या हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजतंय. ‘येक नंबर’म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असं मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज असेल हे ट्रेलर पाहिल्यावर स्पष्ट होतंय.

ट्रेलर लाँच कार्यक्रमात या चित्रपटाबद्दल राज ठाकरे म्हणाले, ‘’ज्याप्रमाणे इतर भाषेत भव्य चित्रपट बनत आहेत. तसेच मोठे चित्रपट आपल्या मराठीतही व्हावेत, असे आम्हाला सगळ्यांनाच वाटत होते आणि त्यातूनच ‘येक नंबर’ चित्रपट उभा राहिला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. काही नावे मी आवर्जून घेईन, त्यात आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांचे विशेष आभार, या चित्रपटासाठी वेळोवेळी आम्हाला त्यांचे सहकार्य लाभले. ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ या एका वाक्यावर संपूर्ण टीम या चित्रपटाचा भाग झाली आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी सादर केली आहे.’’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;