वेब सीरिजमध्ये रोल देतो सांगून अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं; आरोपीला जामीन मंजूर

वेब सीरिजमध्ये रोल देतो सांगून अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं; आरोपीला जामीन मंजूर

अभिनेत्री क्रिसन परेरावर ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या मुंबईतील बेकरला उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. याप्रकरणी क्रिसनला गेल्या वर्षी शारजाहमध्ये अटक करण्यात आली होती. अँथनी पॉल नावाच्या बेकरला गेल्या वर्षी मुंबईत अटक करण्यात आली होती. जवळपास दीड वर्षापासून तो तुरुंगात होता. याप्रकरणातील सहआरोपी राजेश बोभाटे यालाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रकरणातील ड्रग्जचं प्रमाण कमी असल्याने आणि त्यांना तुरुंगात ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नसल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने जामीन मंजूर केला.

“सध्याच्या प्रकरणात आरोपपत्र आधीच दाखल झाले आहेत. आरोपींनी एक वर्ष पाच महिने तुरुंगवास भोगला आहे. रेकॉर्डवर असलेल्या साहित्यानुसार, गांजाचा कमी प्रमाणात समावेश होता. अशा स्थितीत आरोपींची कोठडी सुरू ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नाही. त्यामुळे जामिनावर अर्जदारांची मुदत वाढवून देण्याचा खटला चालवला जातो”, असं न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी आदेशात म्हटलंय.

क्रिसन परेरा ही मुंबईत राहणारी अभिनेत्री असून मार्च 2023 मध्ये एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला होता. रवी असं आपलं नाव सांगून त्याने तिला एका वेब सीरिजच्या भूमिकेची ऑफर दिली होती. या भूमिकेच्या ऑडिशनसाठी तिला युएईला जाण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार 1 एप्रिल रोजी परेरा शारजाहला गेली. प्रवास सुरू होण्यापूर्वी त्या व्यक्तीने क्रिसनला एक ट्रॉफी दिली होती. या ट्रॉफीमध्ये ड्रग्ज लपवण्यात आलं होतं. ती ट्रॉफी युएईमध्ये एका व्यक्तीला देण्यासाठी क्रिसनला सांगण्यात आलं होतं. मात्र शारजाहमध्ये गेल्यानंतर तिला अटक करण्यात आली. भारतीय अधिकाऱ्यांकडून तिची चौकशी होण्यापूर्वी तिने जवळपास तिथे महिनाभर तुरुंगात घालवला होता. नंतर समजलं की पॉलने तिच्या आईशी पूर्वी झालेल्या क्षुल्लक वादाचा सूड म्हणून तिला ड्रग्जच्या आरोपात अडकवलं होतं.

ऑक्टोबर 2023 मध्ये विशेष न्यायालयाने पॉलचा जामीन नाकारला होता. क्रिसन परेराने अनुभवलेला धक्का आणि मुंबई पोलिसांनी दिलेली माहिती लक्षात घेऊन न्यायालयाने हा जामीन नाकारला होता. पोलिसांनी असं सांगितलं होतं की पॉलने क्रिसनप्रमाणेच इतरही चार जणांना अशा प्रकरणांमध्ये अडकवलंय. यात क्लेटन रॉड्रिग्ज नावाच्या डीजेचाही समावेश होता. त्याच्याजवळ ड्रग्जचा केक आढळल्यानंतर शारजाहमध्ये त्याला 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. एका महिन्यानंतर कोर्टाने या प्रकरणातून कठोर आरोप काढून टाकले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;