बंगळुरुतील ‘महालक्ष्मी’ हत्याकांडाला वेगळं वळण; मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या आरोपीची आत्महत्या

बंगळुरुतील ‘महालक्ष्मी’ हत्याकांडाला वेगळं वळण; मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या आरोपीची आत्महत्या

बंगळुरुतील मल्लेश्वरम भागातील एका घरामध्ये काही दिवसांपूर्वी महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे 30 तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. महालक्ष्मी असे या महिलेचे नाव असल्याचे समोर आले होते. ही हत्या कुणी व कोणत्या कारणातून केली याचा तपास सुरू असतानाच आता या हत्याकांडाला वेगळे वळण मिळाले आहे.

महालक्ष्मी हत्याकांडामध्ये तिचा प्रियकर मुक्ती रंजन रॉय हा संशयित आरोपी होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र आता याच मुक्तीचा मृतदेह ओडिशामध्ये एका झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर तो ओडिशामध्ये लपला होता आणि आता त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

मुक्ती रंजन रॉय याचा मृतदेह ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धुसुरी पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या एका गावात आढळला आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाव घेतली. त्याच्या मृतदेहाजवळ एक बॅग, वही आणि स्कुटरही आढळून आली आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि अहवाल आल्यानंतर कुटुंबाकडे सोपवला.

दरम्यान, महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर मुक्ती रंजन रॉय ओडिशात लपून बसला होता. पोलीस त्याचा चौफेर शोध घेत होते. मात्र मंगळवारी त्याने झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. पोलिसांना मुक्ती रंजन रॉयच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही आढळली. यात त्याने बंगळुरूमध्ये महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

पतीपासून वेगळी रहायची…

महालक्ष्मी ही दुसऱ्या राज्यातील असून कामानिमित्त ती बंगळुरूत एकटीच राहत होती. येथील एका मॉलमध्ये काम करून ती आपला उदरनिर्वाह करत होती. महालक्ष्मी विवाहित असून पतीपासून वेगळी राहत होती. तिथेच तिचे मुक्ती रंजन रॉय याच्या सूत जुळले. मात्र राहत्या घरातच मुक्तीने तिचा खून केला आणि मृतदेहाचे 30 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले.

मुक्ती रंजन रॉयवर संशय

महालक्ष्मीची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी आजूबाजूला असणाऱ्या सीसीटीव्हींची पडताळणी केली. त्यात मुक्ती रंजन रॉय कैद झालेला होता. संशयित हालचाल आणि तो सातत्याने पत्ता बदलत असल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्याच्या फोन लोकेशनवरून तो पश्चिम बंगाल आणि ओडिशा बॉर्डरवर लपल्याचे दिसून आले. पोलीस त्याचा माग काढत असतानाच त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;