मोदींचे सभास्थळ चिखलात; सभेवर सावट; धुवाँधार पावसामुळे मैदानावर राडा; तयारीचे तीन तेरा

मोदींचे सभास्थळ चिखलात; सभेवर सावट; धुवाँधार पावसामुळे मैदानावर राडा; तयारीचे तीन तेरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत असून, यानिमित्त स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या सभेवर मुसळधार पावसाचे संकट आले आहे. मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असली तरी गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सभेच्या ठिकाणी पाणी आणि चिखलाचे साम्राज्य आहे. सभेच्या दिवशीही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. मैदानावर पाणी साचल्याने आणि चिखल झाल्याने त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाची पराकाष्ठा सुरू आहे. चिखलावर खडी टाकण्याचे नियोजन केले आहे. सभामंडपातील चिखलामुळे सभेला येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लोखंडी अँगलवर फळ्या टाकून बैठक व्यवस्था करण्याचे काम बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन, उद्घाटने आणि योजनांच्या घोषणांचा पाऊस सुरू आहे. पंतप्रधान मोदी हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज होत आहे. यामध्ये इतरही प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उ‌द्घाटनही होणार आहेत.

मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, मोदींच्या या दौऱ्यावर पावसाचं सावट आहे. बुधवारी शहरभर पावसाने थैमान घातले होते. मोदींच्या सभेची आणि सर्व व्यवस्थेची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सभामंडपात पावसाचे पाणी आणि चिखल होऊन सर्वत्र दलदल झाली आहे. ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार आहेत, त्या मार्गावर आणि मैदानावर सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे.

स्टेजखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, त्या ठिकाणी चिखल झालेला आहे. महापालिका आणि मेट्रोचे अधिकारी सभास्थळी पाहणी करीत आहेत. त्यामुळे बुधवारी उशिरापर्यंत व्यासपीठाच्या परिसरात व दलदलीवर खडी टाकण्याचे काम सुरू होते. यासाठी खडीचे दहा ते बारा ट्रक मागविण्यात आले होते. त्यातच आता हवामान विभागाने गुरुवारीही ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या परिस्थितीवर मात करून सभा यशस्वी करण्याचे आव्हान प्रशासनासह भाजपसमोर राहणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;