Maharashtra Rain update – मुसळधार पावसाचा इशारा; पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, पालघरमधील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

Maharashtra Rain update – मुसळधार पावसाचा इशारा; पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, पालघरमधील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे आणि पालघरमधील शाळा-महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे.

परतीचा पाऊस सध्या धुमाकूळ घालत आहे. काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचे गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा एकदा धुमशान सुरू आहे. बुधवारी सायंकाळी आकाशामध्ये ढगांनी गर्दी केली आणि काही क्षणात सर्वत्र काळोख पसरला. त्यानंतर पावसाचे टपोरे थेंब कोसळू लागले. बघताबघता मुंबई शहर, उपनगरं, ठाणे, पालघर, पुणे येथील रस्ते जलमय झाले. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. काम आटोपून घरी निघालेल्या चाकरमान्यांना घरी पोहोचायला रात्र झाली.

दरम्यान, आजही मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे आणि पालघर येथे पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात 26 सप्टेंबर 2024 रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व सर्व महाविद्यालयं गुरुवारी बंद ठेवणे आवश्यक आहे, असे पत्रक जारी करत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.

ठाण्यातील शाळाही बंद

हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इयत्ता पहिली ली ते बारावीच्या सर्व माध्यमाच्या / मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना गुरुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे पत्रक जारी करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;