उर्मिला काडीमोड घेणार, लग्नाच्या आठ वर्षांनंतर मोहसीन मीरपासून होणार विभक्त
बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लग्नाच्या आठ वर्षांनंतर मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोट घेणार आहे. उर्मिला आणि मोहसीन अख्तर मीर यांचे लग्न 4 फेब्रुवारी 2016 रोजी झाले होते. केवळ धर्म नव्हे तर या दोघांमधील वयात दहा वर्षांचा फरक होता. त्यामुळे लग्नापासून ही जोडी चर्चेत होती, परंतु आता आठ वर्षांचा संसार केल्यानंतर हे दोघे जण वेगळे होत आहेत. उर्मिलाने पतीपासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. हा घटस्फोट दोघांच्या मर्जीने होत आहे, असे काहींनी म्हटले आहे.
मोहसीन अख्तर मीर हा कश्मीरचा रहिवासी असून तो व्यावसायिक आणि मॉडेल आहे. उर्मिला आणि मोहसीन 2014 मध्ये पहिल्यांदा मनीष मल्होत्रा यांच्या भाचीच्या लग्नात भेटले होते. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली होती. मॉडलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मोहसीन मीरने बॉलीवूडमध्येही काम केले आहे. बॉलीवूड अभिनेता म्हणून मोहसीनने ‘लक बाय चान्स’, ‘इट्स ए मेन्स वर्ल्ड’ आणि ‘मुंबई मस्त कलंदर’ यासारख्या चित्रपटांत काम केले आहे.
लग्नावरून उर्मिला ट्रोल
उर्मिलाने मोहसीनसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर सोशल मीडियावरून तिला अनेकांनी ट्रोल केले. मुस्लिम तरुणाशी विवाह आणि वयाने आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान व्यक्तीसोबत लग्न केल्याने उर्मिलाला मोजक्या युजर्संनी ट्रोल केले होते. या दोघांच्या लग्नावरून सोशल मीडियावर नेहमीच वादविवाद पाहायला मिळालेला आहे. आता घटस्फोट होत असल्याने उर्मिला मातोंडकरचा विवाह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List