राज्यातील विकासकामे 30 सप्टेंबरपासून बंद; तिजोरीत खडखडाट, देयके थकली, मिंधे सरकारविरोधात एल्गार

राज्यातील विकासकामे 30 सप्टेंबरपासून बंद; तिजोरीत खडखडाट, देयके थकली, मिंधे सरकारविरोधात एल्गार

राज्य सरकारने विकासाच्या नावाखाली हजारो कोटींच्या निविदा काढल्या. मात्र, विविध विभागांकडील कामांसाठी सरकारच्या तिजोरीत निधीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळपास 36 ते 40 हजार कोटींची देयके सरकारकडे थकली आहेत. या विरोधात राज्यातील कंत्राटदारांनी मिंधे सरकार विरोधात एल्गार पुकारत 30 सप्टेंबरपासून विकासकामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे जोरात सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. गेल्या दीड दोन वर्षापासून आर्थिक बाबींचा अंदाज न घेता करण्यात काढण्यात येणाऱ्या निविदांमुळे सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकासक, जलजीवन मिशन, जलसंधारण, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची बिले देण्यास सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे.

प्रलंबित शासकीय देयकांबाबत सरकार कोणताच निर्णय घेत नसल्याने राज्यात सुरू असलेली विकासकामे 30 सप्टेंबरपासून बेमुदत बंद करण्याचा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आल. तसेच 8 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली.

प्रमुख मागण्या

राज्यातील सर्व विभागांकडील विकास कामांची 40 हजार कोटींची देयके तातडीने द्या.
यापुढे निधीची 100 टक्के तरतूद असल्याशिवाय कामे मंजूर करण्यात येऊ नयेत.
छोट्या कामांचे एकत्रिकरण नको, नियमबाह्य पद्धतीने मोठ्या कंत्राटदारांना कामे देऊ नयेत.
राज्यातील कंत्राटदार व विकासकांना सरकारी कामे करताना संरक्षण कायद्या मंजुर करावा.
सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर संस्था आणि कंत्राटदार यांना शासन निर्णयानुसार कामाचे वाटप व्हावे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;