Mumbai News – मॅनहोलमध्ये पडून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू, अंधेरीतील घटना

Mumbai News – मॅनहोलमध्ये पडून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू, अंधेरीतील घटना

मुंबईला बुधवारी परतीच्या पावसाने झोडपून काढले. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. यामुळे साचलेल्या पाण्यातून चालताना मॅनहोलमध्ये पडून एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरीत घडली. विमल गायकवाड असे मयत महिलेचे नाव आहे.

अंधेरीतील एमआयडीसी परिसरात विमल गायकवाड या रस्त्यावरून चालत असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडल्या. मॅनहोलमध्ये महिला पडल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे तात्काळ शोध मोहिम सुरू केली. महिलेला मॅनहोलमधून बाहेरर काढत तिला कूपर रुग्णालययययात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पावसामुळे वाहतूक व्यवस्थेचीही दाणादाण उडाली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील लोकल उशिराने धावत आहेत. तसेच मुंबईतील रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. रस्त्यांवर मोठ्या वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;