Gen Z ला नोकरीवर घेण्यास कंपन्यांचा नकार, महत्त्वाचे कारण आले समोर

Gen Z ला नोकरीवर घेण्यास कंपन्यांचा नकार, महत्त्वाचे कारण आले समोर

जगभरात अनेक कंपन्या Gen Z कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्यास नकार देत आहेत. इतकंच नाही तर जे कर्मचारी Gen Z आहेत त्यांना कामावरून काढून टाकत आहेत. या पिढीच्या तरुण तरुणींमध्ये प्रोफेशनलिझ्म नाही असे कारण कंपन्यांनी दिले आहे.

Gen Z बाबत एक सर्वेक्षण केले गेले. त्यात एक गोष्ट समोर आली की अनेक मोठ्या कंपन्या Gen Z तरुण तरुणींना कामावर घेत नाहीत,तसेच आहे त्या Gen Z कर्मचाऱ्यांना नारळ देत आहेत. या कर्मचाऱ्यांची कम्युनिकेशन स्किल चांगले नाही, तसेच कामाच्या बाबतीत या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा असतो असेही काहींनी म्हटले आहे.

Intelegent.com या साईटने 10 मोठ्या कंपन्यांशी चर्चा केली. त्यात 10 पैकी सात कंपन्यांनी सांगितले की नुकतंच कॉलेजमधून बाहेर पडलेल्या तरुणांना नोकरी देण्याबाबत कंपनी दहा वेळा विचार करते. या सर्वेक्षणात एक हजार कपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंवला होता. न्युजवीकने याबाबत एक अहवाल सादर केला होता.

कॉलेजमध्ये जे शिकवले गेले आणि प्रत्यक्षात करावे लागणारे काम यात तफावत असतो, त्यामुळे या पिढीच्या तरुण तरुणींना काम करताना अडचणी येतात. या पिढीतल्या तरुणांना कामावर घेण्यासाठी कंपन्या कचरतात कारण हे तरुणी ऑफिसच्या वातावरणत फिट बसत नाहीत. इतकंच नाही तर कामाची जबाबादारी घेण्यात हे तरुण कमी पडतात.

या तरुणांना कॉलेजमधून थेअरॉटिकल नॉलेज तर मिळतं. पण व्यावहारिक ज्ञान, वास्तवातला फरक आणि प्रोफेशनलिझम कमी पडतो. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 75 टक्के कंपन्यांनी म्हटले की नुकतंच कॉलेजमधून पासआऊट झालेल्या तरुणांचे काम समाधानकारक नाही. या तरुणांमध्ये कामासाठी प्रेरणा नसते. तसेच 39 कंपन्यांना वाटले की या पिढीमध्ये कम्युनिकेशन स्किल्सही कमी आहेत. तर 46 टक्के कंपन्यांनी या पिढीत प्रोफेललिझम कमी असल्याचे म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;