दर्शनाला चाललेल्या कुटुंबाच्या रिक्षाला ट्रकची धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू

दर्शनाला चाललेल्या कुटुंबाच्या रिक्षाला ट्रकची धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू

ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एक महिला गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. मध्य प्रदेशातील दमोहच्या समन्ना येथे मंगळवारी ही दुर्घटना घडली. पीडित कुटुंब दमोहहून बांदकपूर येथे दर्शनासाठी चालले होते. मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

दमोह येथील गुप्ता कुटुंबीय मंगळवारी बांदकपूर येथे दर्शनासाठी रिक्षातून चालले होते. रिक्षात गुप्ता कुटुंबातील एकूण 10 जण होते. मात्र बांदकपूरला पोहचण्याआधीच समन्नाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. तर रिक्षात बसलेल्या गुप्ता कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये नेत असताना एकाचा वाटेतच मृत्यू झाला. तर एक बालक आणि महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु होते. यापैकी बालकाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

परिवहन अधिकाऱ्यांनी सदर ट्रकचे फिटनेस व परमिट रद्द केले आहे. घटनेनंतर दमोहचे जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर आले असून रात्रीपासून वाहनांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता नसल्यास वाहने जप्त करण्यात येत आहेत. मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;