सराईत गुन्हेगार पिस्तूलासह अटकेत, गावठी कट्टा जप्त

सराईत गुन्हेगार पिस्तूलासह अटकेत, गावठी कट्टा जप्त

अवैधरीत्या जवळ पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

अंबाजी कल्याणी शिंगे (24, रा. ससाणे नगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शिंगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी वानवडी, मुंढवा, हडपसर भागात गुन्हे दाखल आहेत. शिवाजीनगर पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान नदीपात्र परिसरातील नाना – नानी पार्क भागात एकजण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती अंमलदार सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय पांढरे, कैलास दाबेराव, अंमलदार सचिन जाधव, दीपक चव्हाण, अतुल साठे यांच्यासह पथकाने सापळा रचून आरोपी शिंगेला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता एक पिस्तूल व काडतूस मिळून आले. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक करून पिस्तूल जप्त केले आले आहे. शिंगे याने हे पिस्तूल कोठून आणले, याबाबत शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;