पाऊस, साडी अन् योगायोग..; श्रद्धा – आदित्यला पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘आशिकी 2’

पाऊस, साडी अन् योगायोग..; श्रद्धा – आदित्यला पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘आशिकी 2’

फिल्मी विश्व थोडं वेगळंच आहे. अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की हिरो-हिरोइनची भेट शूटिंगदरम्यान झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. चित्रपटातील रोमँटिक सीन्स कधी खऱ्या आयुष्यातील रोमान्समध्ये बदलतात, हे कळूनच येत नाही. नंतर या सेलिब्रिटींना एकमेकांसोबत अनेकदा पाहिलं जातं. असंच काहीसं बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडलं होतं. 2013 मध्ये ‘आशिकी 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील राहुल जयकर आणि आरोहीची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. या जोडीवर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव झाला. यामध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूरने राहुलची आणि तर श्रद्धा कपूरने आरोहीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघं रातोरात हिट ऑनस्क्रीन कपल बनले. या दोघांनी चर्चा प्रत्येक ठिकाणी होऊ लागली. त्यानंतर आदित्य आणि श्रद्धा खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करू लागल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

श्रद्धा आणि आदित्यचं नातं फार काळ टिकलं नाही, मात्र ब्रेकअपनंतरही जेव्हा कधी दोघं एकमेकांसमोर आले, तेव्हा ते मैत्रीपूर्ण नात्याने भेटले. श्रद्धा आणि आदित्यची जोडी आजही चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय असून हे दोघं जेव्हा कधी एकत्र दिसतात, तेव्हा त्याची आवर्जून चर्चा होते. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी श्रद्धा आणि आदित्यची भेट अशा पद्धतीने झाली, जी पाहून चाहत्यांना ‘आशिकी 2’मधील सीनच आठवला. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांनी एकत्र यावं, अशी मागणी होऊ लागली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एका कार्यक्रमात श्रद्धा काळ्या रंगाची साडी नेसून पोहोचली होती. त्याच कार्यक्रमात आदित्यसुद्धा उपस्थित होता. यावेळी श्रद्धा पावसात उभी होती. पापाराझींसमोर ती फोटोसाठी पोझ देत होती. श्रद्धाच्या असिस्टंटने तिच्यासाठी छत्री पकडली होती. त्याचवेळी तिच्या बाजूला आदित्य आला आणि त्याने श्रद्धाला हाक मारली. त्यानंतर दोघंजण काही सेकंद एकमेकांशी हसत बोलले आणि त्यानंतर श्रद्धा पुढे निघून जाते. यावेळी दोघांमधील केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांना पुन्हा एकदा ‘आशिकी 2’मधल्या रोमँटिक सीनची आठवण झाली. पाऊस, साडी आणि छत्री.. असा योगायोग पुन्हा एकदा या दोघांमध्ये जुळून आला होता.

‘श्रद्धा आणि आदित्यने खरंच एकत्र यावं आणि लग्न करावं’, असं एकाने लिहिलं. तर ‘आदित्य आणि श्रद्धा ऑफस्क्रीन एकमेकांसोबत खूप चांगले दिसतात’, असं दुसऱ्याने म्हटलंय. श्रद्धा काही दिवसांपूर्वी पटकथालेखक राहुल मोदीला डेट करत होती. तर आदित्य अभिनेत्री अनन्या पांडेला डेट करत होता. तेव्हापासून श्रद्धा आणि आदित्य सिंगल असल्याने दोघांनी पुन्हा एकत्र यावं, अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून झाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;