आमच्यात एकच समान गोष्ट म्हणजे लैंगिक..; स्वरा भास्करचा पती काय म्हणाला?

आमच्यात एकच समान गोष्ट म्हणजे लैंगिक..; स्वरा भास्करचा पती काय म्हणाला?

अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न केलं. या दोघांना राबिया ही मुलगी आहे. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये स्वरासोबतच्या नात्याविषयी फहाद मोकळेपणे व्यक्त झाला. कोणकोणत्या गोष्टींबद्दल दोघांमध्ये भिन्नता आहे, याविषयी त्याने सांगितलं. “स्वराची आई जेएनयूमध्ये प्राध्यापिका आहे, तर तिचे वडील नौदल अधिकारी होते. ते इंग्रजी वृत्तपत्रात स्तंभलेखनही करायचे. याविरोधात माझ्या कुटुंबात कोणी दहावीसुद्धा पास झाले नाहीत. माझ्या कुटुंबात मलाच उच्चशिक्षणाची संधी मिळाली. मी टाटा इन्स्टिट्यूटमधून पीएचडी पूर्ण केलं”, असं फहाद म्हणाला.

स्वरा आणि त्याच्यात ग्रामीण-शहरी फरक कसा आहे, याविषयीही त्याने पुढे सांगितल. “मी बरेलीचा आहे, जो जिल्हासुद्धा नाही. मी ओबीसी वर्गात मोडणारा पसमंदा मुस्लीम आहे. तर स्वरा ब्राह्मण आहे. आम्हा दोघांमध्ये फक्त एकच गोष्ट समान आहे ती म्हणजे ‘सेक्शुअल ओरिएंटेशन’ (लैंगिक प्रवृत्ती). आम्ही दोघं स्ट्रेट (समलैंगिक नसलेले) आहोत. आम्ही दोघांनी जात, धर्म, शहर-गाव, वर्ण हे सर्व अडथळे पार केले आहेत. हे आव्हानात्मक आहे, पण तितकंच मजेशीरही आहे.” यावर स्वरा म्हणाली, “आमच्यात आणखी एक फरक आहे, ते म्हणजे मी त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे.” हे ऐकून फहाद म्हणतो की स्वरा नेहमीच ही गोष्ट सर्वांना सांगते, पण याने त्याला कोणतीच समस्या नाही. कारण त्यात लपवण्यासारखं काहीच नाही.

16 फेब्रुवारी 2023 रोजी स्वराने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदशी निकाह केला होता. या दोघांनी धर्माची भिंत ओलांडून आपल्या प्रेमाला एक नवीन ओळख दिली होती. आधी कोर्ट मॅरेज आणि त्यानंतर धूमधडाक्यात हे लग्न पार पडलं होतं. ‘बुद्धिमान लोक म्हणतात की फक्त मूर्खच घाई करतात. फहाद आणि मी लग्नासाठी घाई नक्की केली, पण त्याआधी आम्ही तीन वर्षे एकमेकांचा चांगले मित्र होतो. हे एक असं प्रेम होतं, जे आमच्या दोघांपैकी कोणीच त्याला उमलताना पाहिलं नव्हतं. कदाचित आमच्यात बरेच मतभेद होते, म्हणून असं असेल. हिंदू आणि मुस्लीम.. अशा दोन वेगळ्या धर्मांचे आम्ही आहोत. मी फहादपेक्षा वयाने मोठी आहे आणि आमचं विश्व वेगवेगळं आहे. एका मोठ्या शहराची मुलगी, जिचे कुटुंबीय इंग्रजीत बोलतात आणि एक छोट्या शहराचा मुलगा, जो पारंपरिक पश्चिमी यूपी कुटुंबातून आहे. तो उर्दू आणि हिंदुस्तानी बोलतो. मी हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री आहे, तर तो एक रिसर्च स्कॉलर, सामाजिक कार्यकर्ता आणि राजनेता आहे. मात्र आम्हा दोघांमध्ये एक गोष्ट सामान्य होती, ती म्हणजे शिक्षण. यामुळे प्रत्येक क्षेत्राकडे आम्ही सामान्य दृष्टीकोनातून पाहू लागलो. मग ती भाषा असो, समाज असो किंवा मग देश’, असं स्वराने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये लिहिलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;