विनाअनुदानित शिक्षक आक्रमक; आत्मदहन करणारच! कोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज आंदोलन

विनाअनुदानित शिक्षक आक्रमक; आत्मदहन करणारच! कोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज आंदोलन

सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने वाढीव टप्प्याच्या विषयाला बगल दिल्याने विनाअनुदानित शिक्षकांनी उद्या (दि. 25) आत्मदहनाचा इशारा दिला असून, शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ‘आत्मदहन आंदोलन’ केले जाणार आहे.

वाढीव टप्प्याच्या जीआरसाठी 55 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यातील सर्व जिह्यांमधील हजारो शिक्षक आंदोलन करत आहेत.

शिक्षणमंत्र्यांकडून वाढीव टप्प्याचा जीआर काढण्यात येईल. 18 सप्टेंबरला कॅबिनेट आहे, त्यावेळी निर्णय घेतला जाईल, असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, ती कॅबिनेट झालीच नाही. 19 सप्टेंबरचीही कॅबिनेट रद्द झाली. सोमवारच्या कॅबिनेटमध्ये सरकारने वाढीव टप्प्याबाबत कोणताच विषय घेतला नाही. त्यामुळे संतप्त विनाअनुदानित शिक्षक आक्रमक झाले आहेत. सरकारला याआधी शिक्षकांनी मंगळवारपर्यंत (दि. 24) अल्टीमेटम दिला आहे. वाढीव टप्प्याचा आदेश निघाला नाही, तर बुधवारी आत्मदहन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

यावेळी खंडेराव जगदाळे, शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, प्रेमकुमार बिंदगे, सुनील शेंडे, बाळासाहेब पाटील, भारत भामरे, सचिन चौगुले, युवराज पाटील, राजू भोरे, उत्तम जाधव, यशराज गाडे, नेहा भुसारी, भाग्यश्री राणे यांच्यासह शेकडो शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

…तर सरकारच जबाबदार

n सभागृहात 12 जुलैला वाढीव टप्प्याची घोषणा झाली आहे. अद्यापही त्याचा जीआर आलेला नाही. वेळकाढूपणा आणि वारंवार रद्द होणाऱया कॅबिनेटमुळे शिक्षकांची घोर निराशा झाली आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये सरकारने वाढीव टप्प्याबाबत कोणताच विषय न घेतल्यामुळे शिक्षकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आम्ही बुधवारी आत्मदहन करणार असून, याला याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;