चिकणीतील वन विभागाची 100 एकर जमीन बेकायदा हडपली, संगमनेर तालुक्यात मुळशी पॅटर्न

चिकणीतील वन विभागाची 100 एकर जमीन बेकायदा हडपली, संगमनेर तालुक्यात मुळशी पॅटर्न

संगमनेर-अकोले तालुक्यातील ‘मुळशी पॅटर्न’ हा चर्चेचा विषय असतानाच, सर्वसामान्य जनता, शेतकऱयांना लुटून आणि शासनाच्या जमिनी लाटून गब्बर झालेले उद्योगपती, व्यापारी, राजकीय पुढारी यांनी संगमनेर तालुक्यातील जमिनींचे लचके तोडण्याचे काम केले आहे. शासनाच्या जमिनी बळकावण्याचे काम करणाऱया या ‘लँड माफियां’वर कारवाई होण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील चिकणी या गावात वन विभागाच्या सुमारे 200 एकर जमिनीपैकी 100 एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या आणि नोंदीबाबत चौकशी करून त्या रद्द करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी संगमनेर-अकोले तालुक्यात तत्कालीन महसूल अधिकारी, तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकारी यांच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त होत असून, विद्यमान अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. चिकणी गावातील गट क्रमांक 380/1 मधील 79.97 हेक्टर आर. क्षेत्र जमिनीबाबत हे प्रकरण घडले आहे. या जमिनीवरील नोंदणी व विक्री व्यवहाराबाबत बैठक होऊन या नोंदणी रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या एकूण जागेतील सुमारे 100 एकर जमीन ही काही शेतकरी आणि व्यापाऱयांनी बेकायदा खरेदी केली आहे. या जमिनीचे हस्तांतरण व्यवहार बेकायदा असून, याप्रकरणी गुन्हे नोंदण्यात यावेत आणि जमीन नोंदणीची निर्गमित झालेली सूचना नियमबाह्य असल्याने ती रद्द करण्यात यावी, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव एच. गोविंदराज उपस्थित होते, तर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ सहभागी झाले होते.

संगमनेरातले सहा व्यापारी सहभागी

n चिकणी येथील जमीन बेकायदा खरेदी-विक्री व्यवहार करण्यामध्ये संगमनेरमधील सहा व्यापाऱयांची नावे पुढे आली आहेत. या व्यापाऱयांच्या नावावर 70 एकर जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला आहे. शहर सोडून अचानक ग्रामीण भागात जाणाऱया व्यापाऱयांच्या या उद्योगाची चर्चा सुरू आहे. तसेच शासनाची जमीन खरेदी-विक्री आणि त्याची नोंदणी करणारे महसूलचे कर्मचारी, अधिकाऱयांनी कोणाच्या दबावाखाली हे काम केले, याबाबत चर्चा सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;