साताऱ्यातील अंगणवाडी सेविका आज मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार

साताऱ्यातील अंगणवाडी सेविका आज मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार

मानधनाऐवजी वेतन द्यावे, मासिक पेन्शन मिळाकी, यांसह अन्य मागण्यांसाठी जिह्यातील अंगणकाडीसेविका आणि मदतनीस उद्या (दि. 25) अंगणवाड्या बंद ठेकून मुंबईतील महाआंदोलनात सामील होणार आहेत. यामुळे जिह्यातील तीन हजारांकर अंगणकाडय़ांना टाळे लागण्याचा अंदाज आहे.

मागील नऊ महिन्यांपूर्वी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी 52 दिवस अंगणवाड्या बंद ठेवून आंदोलन केले होते. त्यावेळी राज्य शासनाने आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा अंगणवाडी संघटनांनी  मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. साताऱयातही तीन दिकसांपूर्की सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या वतीने ‘जेल भरो’ झाला होता. आता अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या ठरावानुसार शासनाचा निषेध करण्यासाठी 25 सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर महाआंदोलन करण्यात येणार आहे. यात सातारा जिह्यातील सेविका आणि मदतनीसही सहभागी होणार आहेत. यासाठी जिह्यातील अंगणवाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;