देवदर्शनावरुन परतताना भीषण अपघात; भरधाव कार ट्रकला मागून धडकली, 7 जण जागीच ठार

देवदर्शनावरुन परतताना भीषण अपघात; भरधाव कार ट्रकला मागून धडकली, 7 जण जागीच ठार

अरावली जिल्ह्यातील श्यामलाजी मंदिरात दर्शन करून अहमबादाकडे परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील कार ट्रकला पाठीमागून धडकली. साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथे झालेल्या या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पार चेंदामेंदा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. कारमध्ये एकूण 8 जण होते. हे सर्व श्यामलाजी मंदिरात दर्शन करून अहमदाबादकडे येत होते. मात्र भरधाव वेगातील कार ट्रकला पाठीमागून धडकली आणि भीषण अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चेंदामेंदा झालेली कार कटरच्या सहाय्याने कापून मृतेदह बाहेर काढण्यात आले. सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी होता. त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातानंतर कारचा पार चक्काचूर झाला होता. त्यावरून कारचा वेग जास्त असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस आणि प्रशासनाने अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;