अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनाही धोका, हायकोर्टात आज तातडीची सुनावणी

अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनाही धोका, हायकोर्टात आज तातडीची सुनावणी

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या कुटुंबीयांनी जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त करीत मंगळवारी उच्च न्यायालयात दाद मागितली. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी अ‍ॅड. अमित कटारनवरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या याचिकेवर बुधवारी तातडीची सुनावणी निश्चित केली.

अ‍ॅड. अमित कटारनवरे यांनी मंगळवारी सकाळी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या घटनेकडे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाचे लक्ष वेधले. अक्षय शिंदेला बनावट चकमकीत मारले आहे. या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पुराव्यांमध्ये फेरफार केला जाण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने सुनावणी घेऊन एन्काऊंटरच्या सखोल चौकशीचे तसेच अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश द्या, अशी विनंती अ‍ॅड. कटारनवरे यांनी केली. त्यावर खंडपीठाने याचिकेवर बुधवारी सकाळी तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दर्शविली. याचिकेत एन्काऊंटरवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे न्यायालय सुनावणीवेळी राज्य सरकार व पोलिसांविरोधात कोणती कठोर भूमिका घेतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;