काहीही काम न करता वर्षाला कमावतोय 6 कोटी, तुम्हालाही आवडेल असं काम करायला? वाचा सविस्तर…

काहीही काम न करता वर्षाला कमावतोय 6 कोटी, तुम्हालाही आवडेल असं काम करायला? वाचा सविस्तर…

काहीही काम न करता कोटींमध्ये पैसे कमावण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात. तुम्हाला जर काहीही काम न करता कोटी रुपये कमावण्याचे काम मिळाले, तर तुम्ही हसत हसत हे काम कराल. परंतु, हिंदुस्थानात असे काम मिळणे अशक्यप्राय गोष्ट आहे. पण जर तुम्ही जपानला जाण्यास इच्छूक असाल, तर तुम्हाला ‘काहीही काम न करण्याचे’ काम मिळण्याची शक्यता आहे. कारण जपानमधील एक तरूण काहीही काम न करता वर्षाला तब्बल 6 कोटी रुपये कमावत आहे.

शोझी मोरिमोटो असे या जपानी तरुणाचे नाव असून तो ‘Do Nothing Guy’ या नावाने जपानमध्ये प्रसिद्ध आहे. त्याने स्वत:चा एक असा व्यवसाय निर्माण केला आहे. त्याच्या या व्यवसायात त्याला लोकांसोबत फक्त वेळ घालवण्याचे पैसे मिळतात. विशेष म्हणजे लोकसुद्धा त्याला मोठी रक्कम फी स्वरुपात देतात. त्याच्या कामाचे स्वरुप साधे आणि सरळ आहे. तो नागरिकांना मानसिक आधार देतो, तसेच त्यांचा एकटेपना दुर करण्यासाठी त्यांना सहकार्य करतो. मोरिमोटोच्या म्हणण्यानुसार, त्याचा फक्त सहवास नागरिकांना हवा असतो. त्यासाठी लोकं त्याच्यासोबत करार करतात. तसेच बरेच लोकं व्हेटिंगमध्ये सुद्धा असतात. लोकांसोबत जेवायला जाणे, फिरायला जाणे, त्यांचं बोलण ऐकने अशा पद्धतीच काम तो करतो. तो कोणताही सल्ला लोकांना देत नाही किंवा कोणत्याही अॅक्टिविटीमध्ये सहभागी होत नाही. अशा पद्धतीने तो काहीही काम न करता कोटी रुपये कमावत आहे.

जपान हा देश कितीही प्रगतशील असला तरी, जपानमध्ये एकटेपणाची खूप मोठी समस्या आहे. जवळपास 40 हजार नागरिकांचा मृत्यू एकटेपणामुळे झाल्याचे, एका अहवालात सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर जपानमध्ये वयस्कर नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;