Neha Kakkar-Rohanpreet Divorce : घटस्फोटाच्या बातम्यांवर नेहा कक्करच्या नवऱ्याने सोडले मौन, म्हणाला…

Neha Kakkar-Rohanpreet Divorce : घटस्फोटाच्या बातम्यांवर नेहा कक्करच्या नवऱ्याने सोडले मौन, म्हणाला…

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहे. दोघंही घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जाते आहे. अशातच नेहाच्या नवऱ्याची म्हणजेच रोहनप्रीत सिंह यांने प्रतिक्रिया दिली असून त्याने घटस्फोटाच्या बातम्यांवर मौन सोडले आहे.

रोहनप्रीत सिंह याने इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले की, नेहा आणि माझ्या घटस्फोटाच्या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा आहेत, त्यात काही तथ्य नाही. या फक्त घडवलेल्या गोष्टी आहेत. उद्या कोणी उठेल आणि काही बोलेल त्याचा वैयक्तिक नातेसंबंधावर परिणाम होऊ देणार नाही.

रोहनप्रीत पुढे म्हणाला की, अशाप्रकारच्या गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायच्या. हे लोकांचे कामच आहे त्यांना असे करण्यात मजा येते अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचे वैवाहिक आयुष्य सुखात सुरु असून घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या अफवा आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;