… तर अमित शहा फडणवीसांचा राजीनामा का नाही घेत? काँग्रेसचा सवाल

… तर अमित शहा फडणवीसांचा राजीनामा का नाही घेत? काँग्रेसचा सवाल

गेल्या काही दिवसात राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे मिंधे सरकार जाहीरातबाजीमध्ये व्यस्त असताना दुसरीकडे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. त्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावरून महाराष्ट्र काँग्रेसने फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

”गेल्या सहा महिन्यात गृहमंत्री फडणवीसांच्या नागपुरात 6839 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 61 लोकांचा खून, 134 हाफ मर्डर, 138 दरोडे, 213 लैंगिक अत्याचार, 320 विनयभंग, आणि 172 पॉक्सो केसेस झाल्या आहेत. सध्या गृहखात्याचा मनमानी कारभार सुरू आहे तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा फडणवीसांचा राजीनामा का नाही घेत? असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

”नागपुरातल्या बनावट औषधांसाठीचा पैसा मुंबईतून हवाला रॅकेटमार्गे उत्तर प्रदेशातल्या सहारणपूरमध्ये पाठवला जात होता. या प्रकारामुळे एक मोठी गुन्ह्यांची साखळीच असल्याचे दिसून आले आहे. या परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री कोणत्या तोंडाने स्वतःला जनतेचे रक्षक म्हणवतात असा प्रश्न पडतो, असे काँग्रेसने ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;