योजनेच्या नावाखाली ग्रामस्थांचे फोटो घेतले, भाजपने आंदोलनाच्या बॅनरवर चिकटवले

योजनेच्या नावाखाली ग्रामस्थांचे फोटो घेतले, भाजपने आंदोलनाच्या बॅनरवर चिकटवले

नितेश तांबोळे, रत्नागिरी : रत्नागिरीत योजनेच्या नावाखाली भाजपने काही ग्रामस्थांचे फोटो काढले. नंतर राजकीय स्वार्थासाठी बॅनरवर त्यांचे फोटो छापले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आपले फोटो या बॅनरवरून काढले आहेत.

चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे या गावात काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आणि लगेच काही वेळात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संतोष काळे यांनी राहुल बोन्द्रे यांच्या विरोधात प्रतीअन्नत्याग आंदोलन सुरु केले.

भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या राहुल बोंद्रे या एका व्यक्तीला टार्गेट करून राहुल बोंद्रे विरोधातच बरेचशे बॅनर व फ्लेक्स छापून आणले. त्यावर सावरगाव गावातीलच बर्‍याच व्यक्तींचे फोटोही टाकले. परंतु गावातील बर्‍याच लोकांनी आपापले फोटो त्या बॅनरवरून कापून टाकले. यापैकी काही जणांना विचारणा केली असता ते म्हणाले की आमदारांकडून विविध राजकीय योजनांचा फायदा देण्याचे आश्वासन देऊन, आमचे फोटो आम्ही गावातील काही कार्यकर्त्यांकडे जमा केले होते. ते फोटो या लोकांनी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वापरले. आता भाजपने सावरगाव येथे लावलेल्या प्रत्येक बॅनरवर काही फोटो कापून नेलेले दिसत आहेत. त्यामुळे भाजपाचे बॅनर पाहून लोकांकडून व काँग्रेसकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे. असे फोटो कापून नेलेले बॅनर काँग्रेसवाल्यांनी स्टेटसला लावून, भाजपाला स्वतःचे कार्यकर्ते भेटत नाही मग ते असे गावातील गरिबांचे फोटो नेऊन बॅनरवर लावतात असा प्रचार सुरु केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;