नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात

नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात

मुलांमध्ये मोबईलची क्रेझ चांगलीच पहायला मिळते. त्यामुळे प्रत्येकालाच नवीन मोबाईल घेतल्यावर आनंद होतो. मात्र एका 16 वर्षीय मुलाच्या नवीन मोबाईल घेताल म्हणून जीव गमवावा लागला आहे. नवीन मोबाईल घेतल्याची पार्टी दिली नाही म्हणून त्याच्याच मित्रांनी त्याचा खून केला आहे.

राजधानी दिल्लीमधील शकरपूरमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. 16 वर्षीय सचिनने नवीन मोबाईल खरेदी केला होता. 23 सप्टेंबरला सायंकाळी मोबाईल खरेदी करून तो त्याच्या एका मित्रासोबत घरी निघाला होता. त्यावेळी वाटेत असणाऱ्या एका दुकानात त्याचे काही मित्र त्याला भेटले. सचिनचा नवीन मोबाईल पाहिल्यावर त्यांनी त्याच्याकडे पार्टीचा तगादा लावला. मात्र सचिनने पार्टी देण्यास नकार दिला. यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला आणि वादाच रुपांतर हाणामारीत झालं. त्याचवेळी एकाने चाकू काढला आणि सचिनला दोन वेळा भोसकलं.

सचिनला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तीन आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तीन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;