Buldhana News – जवान दीपक बनसोडे कुपवाडा येथे शहीद, सुट्टीवर गावी येण्यापूर्वीच घात झाला

Buldhana News – जवान दीपक बनसोडे कुपवाडा येथे शहीद, सुट्टीवर गावी येण्यापूर्वीच घात झाला

जम्मू काश्मीरच्या कुपवाडा येथे बुलढाण्यातील जवान दीपक बनसोडे यांना वीरमरण आले आहे. बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथील ते रहिवासी आहेत.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यलयाने दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबरच्या रात्री उशीरा वाहनाचा अपघात होऊन दीपक बनसोडे यांचा मृत्यू झाला. दीपक यांची पत्नी देखील पोलीस दलात कार्यरत आहेत. 24 सप्टेंबरला दीपक हे सुट्टीवर गावी येणार होते. मात्र त्याआधीच त्यांना वीरमरण आल्याने, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे. दीपक यांचे पार्थिव उद्या 25 सप्टेंबरला त्यांच्या मुळगावी पळसखेड नागो येथे आणण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;