पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना टळली, मालगाडीचे पाच डबे रुळावरुन घसरले

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना टळली, मालगाडीचे पाच डबे रुळावरुन घसरले

पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार जिल्ह्यामध्ये न्यू मयनागुडी स्टेशनजवळ मंगळवारी सकाळी 6.20च्या सुमारास एका मालगाडीचे पाच डबे रुळावरुन खाली घसरले. मालगाडी रिकामी होती त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

ट्रेनचे डबे रुळावरुन खाली घसरल्यानंतर रेल्वे सेवेत कोणत्याही प्रकारचा अडथळा समोर आलेला नाही. बोलले जाते की, घटनेवेळी मालगाडीचा वेग कमी होता, त्यामुळे त्याचा फारसे नुकसान झाले नाही. मात्र मालगाडी रुळावरुन घसरल्याने दोन विजेचे खांब आणि पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.या घटनेनंतर येथून जाणाऱ्या ट्रेन दुसरीकडून वळविण्यात आले.

रेल्वेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन रुळावरुन घसरल्याचे नेमेके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;