प्रियांशू चटर्जीचा लेटेस्ट फोटो समोर, इतका बदलला अभिनेत्याचा लूक, ओळखणं कठीण

प्रियांशू चटर्जीचा लेटेस्ट फोटो समोर, इतका बदलला अभिनेत्याचा लूक, ओळखणं कठीण

झगमगत्या विश्वात अनेक कलाकार प्रवेश करतात. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी सेलिब्रिटींना मोठा संघर्ष देखील करावा लागतो. अशात काही सेलिब्रिटींचं नशीब फळफळतं तर काहींच्या वाट्याला मात्र निराशा येते. पण काही सेलिब्रिटी असे देखील असतात जे प्रसिद्धी झोतात तर येतात, पण त्यांची लोकप्रियता फार काळ टिकत नाही. असचं काही झालं आहे अभिनेता प्रियांशू चटर्जी याच्यासोबत. प्रियांशू चटर्जी स्टारर ‘तुम बिन’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट ठरला.

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुम बिन’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तेव्हा नवे विक्रम रचले. सिनेमा प्रियांशू याच्यासोबत संदली सिन्हा, हिमांशू मलिक, राकेश बापट यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाला 20 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे आणि इतक्या वर्षांमध्ये सिनेमातील कलाकारांमध्ये देखील मोठे बदल झाले आहेत.

सिनेमात प्रियांशू याने शेखर मल्होत्रा या भूमिकेला न्याय दिला. भूमिकेला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. पण आता अभिनेत्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे. सध्या सोशल मीडियावर प्रियांशू याचा एका फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटो पाहिल्यानंतर प्रियांशू याला ओळखणं देखील चाहत्यांसाठी कठीण झालं आहे.

 

 

प्रियांशू याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्याचे लांब केस, दाढी दिसत आहे. सांगायचं झालं तर, आगामी प्रोजेक्टसाठी अभिनेत्याने असा लूक केला आहे. अभिनेत्याच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

प्रियांशू चटर्जी याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने फार कमी सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण ‘तुन बिन’ सिनेमामुळे प्रियांशू याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. ‘तुम बिन’ सिनेमा शिवाय अभिनेता ‘वे आपको पहले भी कहीं देखा है’, ‘दिल का रिश्ता’, ‘कोई मेरे दिल में है’ आणि ‘भूतनाथ’ सिनेमात देखील दिसला आहे.

आता प्रियांशू चटर्जी पूर्वी प्रमाणे सिनेमांमध्ये सक्रिय नसला तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर प्रियांशू याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 32.7 K नेटकरी फॉलो करतात. तर अभिनेत्याचे फक्त 412 फॉलोइंग आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;