राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला; काय आहे कारण?

राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला; काय आहे कारण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे अभिनेता सलमान खानच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सलमानच्या भेटीसाठी ते मुंबईतल्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’मध्ये पोहोचले आहेत. जवळपास पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत या दोघांची भेट झाली. या भेटीमागचं कारण ‘येक नंबर’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा असल्याचं कळतंय. उद्या (25 सप्टेंबर) संध्याकाळी या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडणार आहे. यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी सलमानला आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे गेल्याचं म्हटलं जातंय. वांंद्रेमधील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ट्रेलर लाँच होणार आहे. या कार्यक्रमाला अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, निर्माता साजिद नाडियादवाला, अभिजीत जोशी आणि राज ठाकरेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.

‘येक नंबर’ या चित्रपटाच्या टीझर, पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या टीझरच्या सुरुवातीलाच प्रचंड जनसमुदायाने भरलेली सभा… महाराष्टाच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची झलक… जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा कणखर आवाज… उत्साह… दिसत आहे. तर दुसऱ्या क्षणी दंगल, मारामारी, जाळपोळ, धुडगूस दिसत असून ‘ठाकरे साहेब’ असा हलकासा आवाजही कानावर येत आहे. तेजस्विनी पंडित, वरदा साजिद नाडियाडवाला, बवेश जानवलेकर हे ‘येक नंबर’ चित्रपटाचे निर्माते आहेत. हा टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित झाले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या 10 ऑक्टोबरला प्रेक्षकांना मिळणार आहेत.

पोस्टर झळकल्यापासून या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. त्यात लक्षवेधी ठरली, ती पोस्टरमधील करारी नजर आणि त्यात भर टाकली आहे ती पोस्टरमधील बुलंद आवाजाने. त्यामुळे हा बायोपिक आहे का, हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच प्रचंड उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात धैर्य घोलप आणि सायली पाटील यांच्या भूमिका आहेत. ‘येक नंबर’ला अजय-अतुल यांसारखे कमाल संगीतकार लाभले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;