अखेर महायुतीची भानगड पुढे आली! पक्षाच्या नेत्यानेच केली पोलखोल; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

अखेर महायुतीची भानगड पुढे आली! पक्षाच्या नेत्यानेच केली पोलखोल; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र, या योजनेसाठी अर्ज भरण्यापासून बहिणींची झालेली फरफट याची चर्चा झाली. त्यानंतर आता अनेक बोगस लाभार्थ्यांनीही या योजनेचा फायदा घेतल्याचे उघड होत आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना महायुतीने एवढा मोठा खर्च का केला, तसेच राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना आणखी किती काळ चालणार असे प्रश्न उपस्थित होत आहे. आता ही योजना का आणली, याची माहिती भाजप नेत्यानेच दिली आहे. याबाबत पोस्ट करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर त्या भाजप नेत्याचा व्हिडीओ करत पोस्ट लिहीली आहे. त्यात म्हटले आहे की, अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;