आता पोलिसांचीही काळजी वाटू लागली आहे; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सुप्रिया सुळे यांची चिंता

आता पोलिसांचीही काळजी वाटू लागली आहे; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सुप्रिया सुळे यांची चिंता

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी एन्काऊंटर केला. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आरोपीचे दोन्ही हात बांधलेले असताना त्याने फायरिंग कसे केले? असा प्रश्न विचारत सामान्य नागरिकांबरोबरच आता पोलिसांचीही काळजी वाटू लागल्याचा जबरदस्त टोला लगावला आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या म्हणाल्या, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आपला देश नियम कायदे आणि संविधानाने चालतो. मला या प्रकरणामुळे पोलिसांचीही काळजी वाटते. कारण एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले असताना बंदूक हिसकावत त्याने पोलिसांवर फायरिंग कसे केले? त्यामुळे मी फार काळजीत पडले आहे. या राज्यातल्या नागरिकांच्या सुरक्षेचा विषय आहेच पण त्याच बरोबर पोलीसांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होत आहे. दुर्देवाने आपल्या राज्याची अशी स्थिती झाल्याचे खेद होत असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;