सोशल मिडीयावरील ट्रोलिंगमुळे लग्न मोडले; Bigg Boss फेम अब्दुने व्यक्त केली खंत

सोशल मिडीयावरील ट्रोलिंगमुळे लग्न मोडले;  Bigg Boss फेम अब्दुने व्यक्त केली खंत

हिंदीतील बहुचर्चित रिआलिटी शो बिग बॉस सीजन 16 मधून प्रसिद्धी मिळवलेला अब्दू रोजिक त्याच्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने त्याची होणारी पत्नी अमीरासोबत साखरपुडा केला होता. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. मात्र त्याच अमीरा चेहरा लपवण्यात आला होता. त्यामुळे अब्दुच्या पत्नीला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. सर्वजण त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता अब्दूनेच त्यांचे नाते तुटले असून त्यांनी सध्या लग्न न करण्याचा निर्णय घेतला असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

अब्दू रोजिक नुकतेच ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या लग्नाबाबतचा खुलासा केला आहे. यावेळी त्यांने त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना स्पष्टीकरण दिले आहे. माझी एंगेजमेंट तुटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ट्रोलिंग. आमच्या एंगेजमेंटच्या घोषणेनंतर झालेल्या ट्रोलिंगमुळे अमीरा खूप नाराज होती. या द्वेषामुळे तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. या सगळ्याचा मलाही खूप त्रास होत होता. या ट्रोलिंगचा माझ्या कुटुंबावरही वाईट परिणाम झाला.आमच्या कुटुंबालाही आमच्या भविष्याची काळजी वाटू लागली, कारण लोकांना हे समजत नाही की त्यांचे ट्रोलिंग नाते बिघडवू शकते. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला.

‘आम्ही जेव्हापासून एकमेकांना भेटलो तेव्हापासूनच आम्ही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्यातील सांस्कृतिक मतभेद वाढत गेले. त्यामुळे मला लग्नाचा निर्णय बदलावा लागला. आम्हाला दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मी सध्या अशा जोडीदाराच्या शोधात आहेत जो मानसिकदृष्ट्या खंबीर असेल आणि पुढील प्रवासात मला खंबीरपणे साथ देऊ शकेल.’ असे अब्दु म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

आज मी ज्या काही पदावर आहेत ते माझ्या मेहनतीमुळे आहे. मी आतापर्यंत ज्यांना ज्यांना भेटलो, त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. माझ्या प्रेमाबद्दल बोलायचे झाले तर ते काही आयुष्यात एकदाच होते असे नाही. योग्य वेळी प्रेम पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात प्रवेश करेल अशी आशा अब्दुने व्यक्त केली. त्यामुळे तुमचे प्रेम असचं माझ्यासोबत राहुदे असे अब्दु यावेळी म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;