अमेरिकेत विमानाचे गाव, गाड्यांऐवजी घरांसमोर विमाने

अमेरिकेत विमानाचे गाव, गाड्यांऐवजी घरांसमोर विमाने

घराबाहेर कार किंवा बाईक पार्क असणे ही खूप सामान्य बाब आहे. मात्र आज एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत, ज्या गावात चक्क प्रत्येक घराबाहेर विमान पार्क केलेले असते. गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे खासगी जेट आहे. विशेष म्हणजे दैनंदिन वस्तू आणण्यासाठी चक्क विमानांचा वापर केला जातो. पॅलिपहर्नियातील हे गाव असून त्याचे नाव कॅमरून एयर पार्क असे आहे.

कॅमरून एयर पार्क मध्ये 124 घरे आहेत. गावात प्रवेश करताच रस्त्यावरच्या गाडयांऐवजी विमाने उभी असलेली दिसतात. तिथले गावकरी रोजच्या गरजा भागवण्यासाठी विमाने घेऊन निघतात. उदाहरणार्थ, दूध, चहा पावडर किंवा अन्य काही जिन्नस आणण्यासाठी विमाने उडवतात. कुटुंबासोबत लंच किंवा डिनरसाठी जातानाही विमाने घेऊनच निघतात.

या गावाची स्थापना 1963 साली झाली. दुसऱया महायुद्धात अमेरिकेतील वैमानिकांची संख्या लक्षणीय वाढली. युद्धासाठी अनेक एअरफिल्ड बांधली गेली. मात्र युद्ध संपल्यावर एअरफिल्ड बंद करण्यात आली नाहीत. त्यांचे रुपांतर निवासी एयर पार्कमध्ये करण्यात आले. सरकारने या भागात निवृत्त वैमानिकांची राहण्याची व्यवस्था केली. कॅलिफोर्नियातील कॅमरून एयर पार्क हे असेच एक एअरफिल्ड आहे.

 कॅमरून एयर पार्क गावामधील लोकांची जीवनशैलीही अनोखी आहे. तिथे साईन बोर्ड आणि लेटर बॉक्स जमिनीवर ङ्खेवले जातात, जेणेकरून विमान उडवण्यात कोणताही अडथळा येऊ नये. हे गाव आणि या गावात उभी असलेली विमाने यांचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. हे नुसते एक गाव नसून निवृत्त वैमानिकांची अनोखी
लाईफस्टाईल आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;