फडणवीस, भुजबळांचे तोंड पाहू नका! मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा हल्लाबोल

फडणवीस, भुजबळांचे तोंड पाहू नका! मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा हल्लाबोल

आंतरवालीकडे येणारा रस्ता देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून बंद करण्यात आला आहे. मराठा समाजाचे वाटोळे करणाऱ्या या दोघांचे तोंड पाहू नका, अशा तिखट शब्दांत मनोज जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला. आंदोलन संपल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा हिशेब करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. ओबीसी-मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येत आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला.

मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली असली तरी त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी दिवसभरात तीन वेळा प्रकृती खालावली. लघुशंकसाठी सहकारी त्यांना धरून नेत असताना ते जमिनीवर कोसळले. डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून जरांगे यांची प्रकृती ढासळल्याचे सांगून उपचार घेण्याची विनंती केली. मात्र, सरकारकडून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत पाणीही घेणार नाही, असा निर्धार जरांगे यांनी बोलून दाखवला.

संभाजीराजे छत्रपती हे केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी आंतरवालीत आल्याचा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केला. संभाजीराजे यांनी ओबीसींच्या आंदोलनालाही भेट दिली असती तर ते न्याय्य ठरले असते. परंतु त्यांनी आमच्या आंदोलनाला डावलले, असे ओबीसी नेते म्हणाले, मनोज जरंरांगे हे दबावाचे राजकारण करत असून सरकारने त्यांच्या दबावाला बळी पडू नये, असे आवाहनही या नेत्यांनी केले. आंतरवालीच्या वेशीवर उपोषण करणारे मंगेश ससाणे यांनीही संभाजीराजे छत्रपती यांच्या आंतरवाली भेटीवर कडाडून टीका केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;