शरद पवार यांना वाढदिवसाची भेट म्हणून सरकार हद्दपार करा! रोहित पवार यांचे आवाहन

शरद पवार यांना वाढदिवसाची भेट म्हणून सरकार हद्दपार करा! रोहित पवार यांचे आवाहन

येत्या विधानसभेत महाविकास आघाडी 155 हून अधिक जागांवर विजय मिळवत सत्तेत येणार आहे. शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना 85 आमदारांची भेट देऊन सध्याचे भ्रष्टाचारी सरकार हद्दपार करा, असे आवाहन कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. सासवडला आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक मेळावाप्रसंगी रोहित पवार बोलत होते.

आपल्या भाषणात रोहित पवार यांनी विविध दाखले देत सरकारच्या भ्रष्टाचाराची चिरफाड केली. सर्वेक्षणानुसार विधानसभेला भाजपा 65 जागा, शिंदे गटाला 25 ते 30 जागा, तर गुलाबी टोळीला अवघ्या 9 ते 11 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यातून माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी उमेदवारी मागितली आहे. रोहित पवार यांनी आपल्या भावना शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचविल्या जातील, असे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;