लोकलमध्ये 20 लाखांची रोकड सापडली

लोकलमध्ये 20 लाखांची रोकड सापडली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी रात्री 9.57 ची लोकल धडधडत कल्याण स्थानकात येऊन पोहोचली आणि जनरल डब्याबाहेर पोलिसांचा गराडा पडला. पोलीस तातडीने डब्यात शिरले आणि निळय़ा रंगाची ती संशयास्पद बॅग ताब्यात घेतली. आत काय आहे हे समजेना. बॉम्ब तर नाही ना, अशी शंकाही प्रवासी विचारू लागले. मात्र ‘ती’ बॅग पोलीस ठाण्यात नेऊन उघडताच  आतमध्ये  पाचशे रुपयांच्या नोटाच नोटा होत्या. 20 लाख रुपयांचे हे घबाड नेमके कोणाचे आहे? या बॅगेचा मालक कोण, याचा शोध आता कल्याण पोलीस घेत आहेत.

आसनगाव रेल्वे स्थानकातून रात्री उशिरा मुंबईकडे जाणाऱया लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती. जनरल डब्यामध्ये बसलेल्या एका प्रवाशाला बेवारस बॅग दिसली. त्याने बॅगेबाबत अन्य प्रवाशांकडे विचारणा केली. पण कुणीच त्यावर हक्क सांगितला नाही. अखेर या प्रवाशाने पोलीस पंट्रोल रूमला पह्न केला. कल्याण स्थानकात लोकल येताच पोलिसांनी ही बॅग ताब्यात घेतली. बॅग उघडल्यानंतर आतमध्ये 20 लाखांच्या नोटांबरोबरच औषधांचा बॉक्सही आढळला. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;