Badlapur Sexual Assault : नराधम अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात संशयास्पद मृत्यू

Badlapur Sexual Assault : नराधम अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात संशयास्पद मृत्यू

बदलापूरमधील शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज तळोजा कारागृहातून ठाणे येथे आणले जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावली व त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयात आणण्यात आला असून तेथे त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन होणार आहे.

अक्षयची पाहिली बायको त्याला लग्नानंतर पाच दिवसांनी सोडून गेली होती. तिने अक्षयवर बलात्कार आणि मारहाणीचा आरोप केला होता. अक्षयच्या पहिल्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन बदलापूर पोलीस अक्षयचा ट्रान्झिट रिमांड घेण्यासाठी तळोजा कारागृहात गेले होते. आरोपी अक्षयला घेऊन सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक मुंब्रा बायपासजवळ पोहोचले. त्यावेळी शिंदे याने एका हवालदाराची बंदूक हिसकावून त्याच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल, दुसऱ्या अधिकाऱ्याने त्याच्यावर गोळी झाडली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;