नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट! पढेगाव ते राहुरी रेल्वे चाचणी यशस्वी, ताशी 130 कि. मी वेगाने धावली रेल्वे

नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट! पढेगाव ते राहुरी रेल्वे चाचणी यशस्वी, ताशी 130 कि. मी वेगाने धावली रेल्वे

नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत पढेगाव ते राहुरी या 14 कि .मी. अंतराची चाचणी सोमवारी घेण्यात आली. येत्या काही कालावधी मध्ये नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पुर्ण होणार असुन,यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

या पुर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती ( डबललाईन ) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे . यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई , अंकाई ते अंकाई किल्ला ,अंकाई किल्ला ते मनमाड ,कोपरगाव ते कान्हेगाव,बेलापूर ते पुणतांबा,बेलापूर ते पढेगाव,निबळक ते वांबोरी,पुणतांबा ते कान्हेगाव या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता सोमवारी ( दि. 23 ) रोजी 14 कि .मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता ऐकूण 135 की मी अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती दीपक कुमार उप मुख्य अभियंता (बांधकाम) नगर ,यांनी दिली .

मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडी चा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईन मुळे अनेकदा रेल्वे गाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागते. मात्र आता हा पुर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाड्यांचा थांबा आता बंद होणार आहे . तसेच या द्रुतगती रेल्वे मार्गावर प्रवरा नदी वरील 305 मीटर लांबीचा,12 मीटर उंचीचा, गोदावरी नदी वरील 288 मीटर लांबीचा व 18 मीटर उंची असलेले सर्वात मोठे दोन पुल बांधण्यात आले आहेत.ह्या रेल्वे पुल बनवण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला असून.नगर ते मनमाड रेल्वे द्रुतगती मार्गा मधील सर्वात मोठया लांबीचे व उंचीचे पूल असून या पुला मुळे नगर -मनमाड रेल्वे गाड्या धावण्यासाठी बळकटी मिळाली आहे.

तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 130 प्रति किमी वेगाने धावणार असल्याने,रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे .पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे .सोमवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे. यावेळी ताशी 130 वेगाने धावली.

या अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत पढेगाव ते राहुरी द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी घेतली. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी ए के पांडे, मुख्य अभियंता राकेश कुमार यादव,उप मुख्य अभियंता दीपक कुमार,कार्यकारी अभियंता डी पी पटेल,कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा,सेक्शन इंजिनिअर आर डी सिंग,सेक्शन इजिनिअर,धर्मेंद्र कुमार,इजिनिअर सुद्धांसू कुमार,ज्युनियर इंजिनियर,प्रगती पटेल,इंजिनियर रामजी कुमार एक्झिकेटीव, इंजिनिअर व आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;