मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असे म्हणणारा टीसी आशिष पांडेला रेल्वेने केले निलंबीत

मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असे म्हणणारा टीसी आशिष पांडेला रेल्वेने केले निलंबीत

मी मुंबईत राहूनही मी मराठी व मुस्लिम माणसांना एक रुपयाचा बिझनेस देत नाही, मी फक्त भैय्या लोकांच्या रिक्षातच बसतो, त्यांनाच धंदा देतो… अशी अरेरावीची भाषा करणाऱ्या एका टीसीला पश्चिम रेल्वेने निलंबीत केले आहे. या टीसीचा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आशिष पांडे असे त्याचे नाव आहे.

आशिष पांडे याचा एक ऑडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ऑडिओत आशिष पांडे समोरच्या एका व्यक्तीशी अरेरावी करून बोलताना ऐकू येत आहे. ते सांगतात की मी विक्रोळीला टागोर नगरला राहतो. मी मुस्लीम आणि मराठी लोकांना बिझनेस देतच नाही. मला कोणी मराठी किंवा मुस्लीम रिक्षावाला भेटला तर मी त्यांच्या रिक्षातही बसत नाही. मी आता ट्रु कॉलरवर तुमचं नाव बघितलं तर मला तुम्ही महाराष्ट्रीय असल्याचे समजले. त्यामुळे मी ठरवलं की मी तुम्हाला धंदा देणार नाही. मी मुंबईत राहून मराठी लोकांना धंदा देणार नाही, अशी मुजोर भाषा आशिष पांडे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;