छत्तीसगडच्या राजनांदगावामध्ये वीज कोसळली, 4 मुलांसह 8 जणांचा मृत्यू

छत्तीसगडच्या राजनांदगावामध्ये वीज कोसळली, 4 मुलांसह 8 जणांचा मृत्यू

छत्तीसगडच्या राजनांदगांवामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे वीज पडून आठ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमानी येथील जोरातराई गावातील आहे. सोमवारी अचानक हवामान बदलले आणि जोरदार पाऊस सुरु झाला. आणि अचानक वीज कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला ज्यामध्ये चार मुलांसह चार शाळकरी मुलींचा समावेश होता. तर एकजण गंभीर जखमी झाला, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

छत्तीसगडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. इथल्या अनेक ग्रामीण परिसरात पुर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वीज कडाडत होती. तसेच सोमवारी दुपारी राजनांदगाव जिल्ह्यातील सोमाणी पोलीस स्टेशन हद्दीतील जोरातराई येथे अचानक वातावरण खराब झाले आणि मुसळधार पावसासह वीज पडून 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विजेच्या धक्क्याने चार तरुणांचा मृत्यू झाला, तर चार शाळकरी मुलांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. लोकांनी तातडीने तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाऊस आणि खराब हवामानात लोकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि कोणत्याही मोकळ्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;